प्रेमविवाह केल्यामुळे मुलाच्या आईची काढली विवस्त्र धिंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

प्रेमप्रकरणातून विवाह केल्याने मुलाच्या आईची विवस्त्र धिंड काढल्याची घटना जिल्ह्यातील उपळाई (ता. कळंब ) येथे घडल्याची चर्चा आहे. प्रेम प्रकऱणातुन मुलाच्या आईला निर्वस्त्र करुन गावातुन धिंड काढल्याची चर्चेने खळबळ उडाली. पोलिसांनी मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगुन हात वर केले आहेत.

उस्मानाबाद : प्रेमप्रकरणातून विवाह केल्याने मुलाच्या आईची विवस्त्र धिंड काढल्याची घटना जिल्ह्यातील उपळाई (ता. कळंब ) येथे घडल्याची चर्चा आहे. प्रेम प्रकऱणातुन मुलाच्या आईला  विवस्त्र करुन गावातुन धिंड काढल्याची चर्चेने खळबळ उडाली. पोलिसांनी मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगुन हात वर केले आहेत.

एकाच समाजातील मुलगा व मुलगी प्रेमात पडले होते, त्यातुन त्यांनी गावातून पळ काढला. याचा संशय मुलीच्या घरातील लोकांना आल्याने त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यानंतर मुलगी सापडली तेव्हा तिला गावात आणले. पण त्यानंतर जे काही घडले ते अतिशय घृणास्पद व भयानक होते. मुलीला पळवुन नेल्याच्या रागातुन मुलाच्या आईला मारहाण करण्यात आली, त्यापुढे जाऊन त्या महिलेला विवस्त्र करण्यात आल्याची चर्चा आता जोरात सूरु झाली आहे. या प्रकारामुळे दोन्ही बाजुच्या लोकांनी येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. तिथे मात्र मुलाच्या आईवरील झालेला प्रकार सांगण्या अगोदर मुलावर बाल लैंगिक कायद्याचा धाक दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी समजुतीची भूमिका घेत तक्रार नसल्याचे लेखी व कॅमेरासमोर देऊन ही मंडळी गावात परतली.

मात्र काही लोकांच्या चर्चेतून ही बातमी बाहेर आली. या सगळ्या प्रकारानंतर गावातून अधिकृत त्याला कोणीही दुजोरा देत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी अधिकृत भूमिका मांडली असुन त्यामध्ये त्यांनी असे घडलेलेच नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तक्रार आल्यास कारवाई करू पोलिसांचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत पोलिसांनी काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, घटनेबाबत काही लोकांनी मीडियामध्ये अपुरी माहिती पुरवून संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे. या घटनेच्या अनुषंगाने रितसर तक्रार आल्यास खात्री करून पोलिस खात्याकडून रीतसर कारवाई केली जाऊ शकते सध्या गावात शांतता असून निर्माण केल्या गेलेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Web Title: public disgrace of women in osmanabad District