अर्धी महापालिका रजेवर, नागरिक मात्र वाऱ्यावर!

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दीर्घ सुटीवर गेल्यानंतर त्याचा फायदा घेत विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी रजा घेण्याचा सपाटाच लावला आहे. विशेष म्हणजे सुटीवर गेलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार कोणाकडे याचीदेखील कोणाला माहिती नाही. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. दोन) काही विभागांची पाहणी करून आयुक्तांना पत्र दिले.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महापालिकेच्या मुख्यालयात शुकशुकाटच आहे. निवडणूक ड्युटीवर असल्याचे सांगत अनेक अधिकारी-कर्मचारी मुख्यालयाकडे फिरकलेच नाहीत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे सोमवारपासून (ता. २७) मुख्यालयात अधिकारी राहतील या आशेवर अनेक नागरिक तक्रारी घेऊन येत आहेत.

आठवडा उलटला तरी मुख्यालयाचे चित्र बदललेले नाही. त्यामुळे नागरिकांना आल्या पावली परत फिरावे लागत आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दहा दिवसांच्या सुटीवर आहेत. आयुक्तच नसल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचारी मुख्यालयात थांबायला तयार नाहीत. अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी सुटी टाकली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सकाळी विविध विभागांत जाऊन पाहणी केली असता, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, दक्षता पथकप्रमुख एम. बी. काझी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर हे सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे हे कार्यालयात बसत नाहीत. लेखा विभागात लेखाधिकारी संजय पवार आढळून आले. अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे बाहेर असल्याचे सांगण्यात आले. सुटीवर असलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार नेमका कोणाकडे याबाबत विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर कोणालाही देता आले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com