पुजा चव्हाणचे वडील उतरले शांता राठोडच्या विरोधात; पोलिसांकडे तक्रार

pooja father.
pooja father.

परळी वैजनाथ (बीड): येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पुजाची आजी आहे असं सांगून मोठा धक्कादायक दावा केला होता. पुजाचे वडील लहू चव्हाण यांना मंत्री संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुजाचे वडील लहू चव्हाण यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात आरोप झाल्याने २८ फेब्रुवारीला मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. यानंतर आजी म्हणून पुढे आलेल्या शांता राठोड यांनी पुजा चव्हाण यांच्या आई, वडीलांना संजय राठोड यांनी प्रकरण दडपण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता.

मंगळवारी (ता.०२) लहू चव्हाण यांनी येथील शहर पोलिस ठाण्यात शांता राठोड यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे की, शांता राठोड आमची नातेवाईक नाहीत. तरीही नातेवाईक असल्याचे सांगून आमची बदनामी करत आहे. म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व आमची बदनामी थांबवावी असे या अर्जात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com