हिंगोली जिल्ह्यात एक लाख ७८ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

राजेश दारव्हेकर
Thursday, 22 October 2020

१४ ऑक्टोबर रोजी शासनाच्या महसूल विभागाने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते .

हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाल्यापासून अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे मोठे  नुकसान झाले. त्यात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला जून, जुलै व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे सुरू होते. त्यानंतर आँक्टोंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील देखील सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सध्या सर्वच क्षेत्रावरील पंचनामे केले आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ८.१६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ६३३.९९ एरवरील पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया आहे . मध्यंतरी सतत होणाऱ्या पावसामुळे पंचनाम्याला अडथळा आला होता मात्र मागील ते तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली यामुळे पंचनाम्याला गती मिळाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. 

हेही वाचामुदखेड सिआरपीएफ केंद्रात पोलिस स्मृती दिवस साजरा -

जवळपास ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला

१४ ऑक्टोबर रोजी शासनाच्या महसूल विभागाने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी जिल्ह्यात जून, जुलै व सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत होते. त्यातही जून व जुलैमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले होते. जवळपास ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात  पिकांचे नुकसान झाले तर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने  आलेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. यात सोयाबीन पिकाचा समावेश आहे . या महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामेही

येथे क्लिक कराकोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार -

अजूनही ३० ते ३५ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्याचे शिल्लक

करण्याच्या सूचना दिल्यानंतर तालुका स्तरवरून एकत्रित अहवाल पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडून तालुकास्तरीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पंचनाम्यापैकी अजूनही ३० ते ३५ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्याचे शिल्लक आहे . येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकसानीचा अहवाल आल्यानंतर सदरील अहवाल मदतीच्या अनुषंगाने शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे श्री. लोखंडे यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punchnama of crops on one lakh 78 thousand hectares completed in Hingoli district