esakal | अखेर पुर्णा-अकोला डेमु लोकल गाडी धावली
sakal

बोलून बातमी शोधा

demu

अखेर पुर्णा-अकोला डेमु लोकल गाडी धावली

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: कोरोना संकटामुळे दीड वर्षांपासून पुर्णा-अकोला मार्गावरून धावणारी पॅसेंजर गाडी बंद होती. आज सोमवारी (ता. १९) अखेर या मार्गाने डेमु लोकल गाडी धावल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच बोल्डा स्थानकावर चालक व स्टेशन मास्टर यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना संकटामुळे दीड वर्षापासून पुर्णा ते अकोला रेल्वे मार्गाने धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद होत्या. या मार्गाने काही एक्स्प्रेस गाड्या मात्र सुरू होत्या. मात्र पॅसेंजर बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी अडचणी होत्या. सर्वात स्वस्त आणि उत्तम प्रवासा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

दरम्यान कोरोनाचे संकट कमी झाल्यावर पुर्णा-अकोला मार्गाने पॅसेंजर सुरू करावी अशी मागणी होती. त्यातच कोरोनाचे संकट कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत या मार्गाने प्रवाशांच्या मागणीनंतर या मार्गाने डेमु लोकल गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी पुर्णा ते अकोला पहिली डेमु लोकल गाडी धावली.

हेही वाचा: औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकल गाडी सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांतून आनंद साजरा करण्यात आला. पुर्णा अकोला रेल्वे मार्गावरील बोल्डा रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांनी सकाळी साडेआठ वाजता बोल्डा स्थानकावर गाडी येताच जंगी स्वागत केले. रेल्वेचे चालक राजु व स्टेशन मास्टर मीनासिंग यांचा सत्कार केला. तसेच रेल्वेला देखील पुष्पहाराने सजवून प्रवाशांना पेढे वाटप केले. यावेळी संजय मुलगीर, देवानंद मुलगीर, उमेश टेकाळे, वैभव मुलगीर, बळीराम भुसनर, शेरूखा पठाण, गोधाजी मंदाडे गजानन मंदाडे, गणेश मंदाडे आदीची उपस्थिती होती.

हेही वाचा: यंदा तुरीचा पेरा वाढला; औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पेरा

सोमवारी गाडी क्रमांक ५७५८२ पूर्णा - अकोला डेमू लोकल पूर्णा येथून सकाळी सात वाजता निघाली ती बोल्डा स्थानकात सकाळी साडेआठ वाजता पोहचली. तर ही गाडी अकोला येथे दुपारी १.४५ ला पोहोचणार आहे. तर परतीत सोमवारी गाडी क्रमांक ५७५३९ अकोला - पूर्णा डेमू लोकल अकोला येथून दुपारी दोन वाजता निघून पूर्णा येथे रात्री ८.३० वाजता पोहोचणार आहे.

loading image