esakal | यंदा तुरीचा पेरा वाढला; औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पेरा
sakal

बोलून बातमी शोधा

parani

यंदा तुरीचा पेरा वाढला; औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पेरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कडधान्यामध्ये शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळत आहेत. औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत तुरीच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष क्षेत्रात वाढ झाली आहे. बदनापूर येथील बीडीएन ७११ या संशोधित वाणाची उत्पादकता चांगली असल्याने या वाणाच्या लागवडीकडे कल वाढला आहे. तिन्ही जिल्ह्यांत तुरीचे सरासरी क्षेत्र एक लाख २७ हजार हेक्‍टर आहे. तुलनेत एक लाख ६१ हजार ९६४ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ११३.३२ टक्के पेरणी झाली आहे. या जिल्ह्यात तुरीचे ३१ हजार ९७१ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ३६ हजार २२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात १०९.९३ टक्के पेरा झाला असून ५० हजार सरासरी क्षेत्र आहे. ५५ हजार २९० हेक्टरवर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात १५७.४८ टक्के पेरा झाला असून ४४ हजार ७३४ सरासरी क्षेत्र आहे. ७० हजार ४४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मूग, उडदाची पेरणीही अधिक-
या तीन जिल्ह्यांत मुगाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार २२५ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात ८० टक्‍के म्हणजे ५७ हजार ६५५ हेक्‍टरवर मुगाची पेरणी झाली आहे. उडदाचे सरासरी क्षेत्र ४६ हजार ६५४ हेक्‍टर असून १२६ टक्‍के अर्थात ५८ हजार ८०९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

हेही वाचा: 'पवार कुटुंबाचे इतर पक्ष आणि राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध'

कपाशीकडून तुरीकडे
औरंगाबाद हा प्रामुख्याने बीटी कापूस पिकविणारा जिल्हा. मात्र गेल्या तीन - चार वर्षांपासून या पिकावर येणाऱ्या किडी, अळींच्या प्रादुर्भावामुळे खर्चात वाढ झाली. उलट प्रतिहेक्टरी उत्पादनात घट झाली. त्यामुळे काही शेतकरी तुरीच्या पेरणीकडे वळले. त्यासाठी बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने शिफारस केलेले बीडीएन ७११ वाण उपयुक्त ठरले आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत आजही लसीकरण बंदच, ४० हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

‘बीडीएन’चा आतापर्यंतचा पेरा-
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबर म्हणाले, विद्यापीठांतर्गत बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने आजवर तूर, मूग, उडीद, हरभरा आदींची अनेक उत्तम वाण आणले. यापैकीच तुरीचे वाण अधिक उत्पादन देत आहे. कडधान्य पैदासकर, संशोधक डॉ. दीपक पाटील यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारे बीडीएन ७११ हे वाण २०१३-१४ मध्ये संशोधित केले. गेल्या चार खरिपात प्रतिबॅग सहा किलोप्रमाणे चार हजार ५३६ बॅग तूर बियाणांची पेरणी झाली. एकरी सहा ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची या वाणात क्षमता असल्याचे ठोंबरे म्हणाले.

loading image