पूर्णा नदीवरील पुल पाण्याखाली

पंजाबराव ठाकरे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

येथील घाट परिसरात बुधवार (ता. 7) च्या  रात्रीपासून सतत पाऊस सुरू असल्याने नांदुरा ते जळगाव या मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. शुक्रवार सकाळी 7 वाजल्यासून ह्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोबतच भेडवळ ते खामगाव मार्गावरील भास्तन पुलावर देखील पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आहे. 

संग्रामपूर (बुलढाणा) ः येथील घाट परिसरात बुधवार (ता. 7) च्या  रात्रीपासून सतत पाऊस सुरू असल्याने नांदुरा ते जळगाव या मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. शुक्रवार सकाळी 7 वाजल्यासून ह्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोबतच भेडवळ ते खामगाव मार्गावरील भास्तन पुलावर देखील पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आहे. 

दरम्यान, खिरोडा पूर्णा नदीपात्र दुथडी वाहत असल्याने हा पूल दोन फुटाने खाली असल्याची माहिती आहे. वारी येथील हनुमानसागर वाण धरणा यामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाल्याने आज सकाळी या धरणाचे सहाही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात  आला आहे.

दरम्यान, वाण धरणातून पाण्याचा विसर्ग आवक पाहून वाढविण्यात येत असल्याने नदी काठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात पाण्याची आवक कमी झाल्यास पाण्याचा विसर्गही कमी करण्यात येणार असल्याची माहिती वाण प्रकल्प अधिकारी गुल्हाने यांनी दिली. वाण नदी पात्रात वाढते पाणी पाहता काटेल ते कोलद गावाचा संपर्क तुटला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: purna river bridge are be closed