esakal | पूर्णा नदीला पूर, औंढा-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प |Hingoli News
sakal

बोलून बातमी शोधा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे  बारा दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने यामुळे नदीला पूर आला आहे. त्याचे पाणी माथा गावाजवळील पुलावरून जात असल्याने बुधवार (ता.२९) औंढा -औरंगाबाद रस्ता बंद झाला आहे.

पूर्णा नदीला पूर, औंढा-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) बारा दरवाजे उघडून पूर्णा नदी (Purna River) पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने यामुळे नदीला पूर आला आहे. त्याचे पाणी माथा गावाजवळील पुलावरून जात असल्याने बुधवार (ता.२९) औंढा -औरंगाबाद रस्ता बंद झाला आहे. दोन तासांपेक्षा अधिक वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प असून वाहनांच्या लांबच लांब रांगा (Aundha Nagnath) लागल्या आहेत. पुलावरून दिवसभर रात्रभर पाणी जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे. तसेच आज सकाळी साडेदहा वाजता नदीचे पाणी माथा नदीच्या पुलावरून जात आहे. या ठिकाणी (Hingoli) महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन तळ ठोकून बसले आहेत. तसेच नागरिकांनी पुलावरून वाहन घेऊन जाण्याचे धाडस करू नये असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकारी बसले आहेत. त्यामध्ये तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सचिन जोशी, सरपंच माथा संजय कुटे, जमादार संदीप टाक, ज्ञानेश्वर कुटे, रंगनाथ कुटे, बालाजी मगर, पांडुरंग गीते, तलाठी विठ्ठल पुरी, संदीप डोंगरे, राघोजी कुटे, पोलीस कॉन्स्टेबल पिराजी पाचपुते या ठिकाणी हजर होते.

हेही वाचा: लातूर : मांजरा,तेरणाच्या पुरामुळे राज्यमार्ग बंद; वाहतूक खोळंबली

loading image
go to top