जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या द्रास येथे पूर्णेचा जवान आॅनलाईन परिक्षा देत आहे

file photo
file photo

पूर्णा ( जिल्हा परभणी) : येथील आनंद शिवाजी भालेराव हे भारतीय सैन्य दलातील सैनिक लद्दाख मधील द्रास या हिमालय पर्वतांच्या रांगेतील टायगर हिल या शिखरावर ऑनलाईन पद्धतीने पदवीची परिक्षा देत आहे.

मनात शिक्षणाची आस असेल व दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कितीही अडथळे व अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते हे दाखवून दिले आहे भारतीय सैन्य दलातील एका सैनिकाने. येथील सिद्धार्थनगर मधील रहीवासी असलेला व भारतीय सैन्य दलातील नायक पदावर असलेला जवान समुद्र सपाटीपासून १७५०० फूट उंचीवर असलेल्या  टायगर हिल या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे.त्या ठिकाणी सध्या उणे तेरा तापमान आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून हा भाग ओळखल्या जातो.

ऑनलाईन पद्धतीने पदवीच्या अंतिम वर्षाची आपली परिक्षा दिली

त्यांची रेजिमेंट समुद्र सपाटीपासून १९००० फूट उंचीवरील व उणे १८ तापमान असलेल्या शिखराच्या दिशेने कुच करत आहेत.दरम्यान त्यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाची परीक्षा देत आहेत.त्यांनी या शिखरावरच मोबाईल फोन वरून ऑनलाईन पद्धतीने पदवीच्या अंतिम वर्षाची आपली परिक्षा दिली.बदलते वातावरण ,समोर शत्रू ,सातत्याने होणारी फायरिंग अशा बिकट स्थितीतही तो शिक्षणाचा ध्यास व ओढ सोडत नाही.वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करतो व परिक्षा देतोय.घरात सर्व सुविधा, सुरक्षितता,पोषक वातावरण असतानाही अनेक विद्यार्थी वाचनाचा व अभ्यासाचा कंटाळा करतात त्यांच्या समोर आनंद भालेराव यांनी आदर्श निर्माण केला आहे.

भारतमातेचा सुपुत्राचा आदर्श तरुणाईने घ्यावा

यासाठी त्यांचे सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी मेजर बलराज पूनिया ,नायब सुभेदार प्रताप सिंह ,लेफ्टनंट नायक वैभव कांबळे,रणजित खंदारे, अतुल कुर्हे व  सहकारी सैनिकांनी प्रोत्साहन दिले त्यांचा उत्साह वाढवला .ही बाब कळाल्यानंतर खासदार संजय जाधव, उपनगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, शिवसेना संतोष एकलारे, नगरसेवक उत्तम खंदारे यांनी भ्रमणध्वनीवरून आनंद भालेराव यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रतिकूल व तणावपूर्ण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणाऱ्या या भारतमातेचा सुपुत्राचा आदर्श तरुणाईने घ्यावा एव्हढीच अपेक्षा.

पदवीची परिक्षा देतोय मला त्याचा खुप अभिमान

माझ्या मतदारसंघातील वीर जवान सध्याच्या भारत पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत टायगर हील सारख्या अत्यंत कठिण व महत्वपूर्ण ठिकाणी कर्तव्य बजावत आहे.दररोज जीवन मरणाची परिक्षा देत तो देशाचे संरक्षण करण्याचे अभिमानास्पद काम करतोय. हे करत असतांनाच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने दिलेल्या शिक्षणाचा मंत्र तो जपतो आहे.ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाहीत अशा स्थितीतही आनंद भालेराव हा योद्धा अभ्यास करून पदवीची परिक्षा देतोय मला त्याचा खुप अभिमान वाटतो.

- संजय जाधव, खासदार , परभणी

संकटाना न घाबरता संकटाना संधी समजून त्यावर शौर्याने व धैर्याने मात

संकटाना न घाबरता संकटाना संधी समजून त्यावर शौर्याने व धैर्याने मात करायची शिकवण मला छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळाली तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून मला शिक्षणाचा मंत्र मिळाला.शिक्षणात कितीही अडथळे आले तरी ते पार करायची उर्जा मला या महामानवाकडून मिळाली.मला जसा व जशा स्थितीत वेळ मिळेल त्या स्थितीत मी अभ्यास करतोय शिकतोय.

- आनंद भालेराव, नायक भारतीय सैन्य दल, टायगर हिल (लद्दाख)

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com