बापरे...यासाठी पहाटेपासूनच लागताहेत रांगा

विनायक हेंद्रे
Wednesday, 29 April 2020

जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने बँकेच्या वेळेत केवळ शंभर ग्राहकांना पैसे काढण्याची किंवा खात्यातील व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. तसेच केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत. यामुळे येथे पहाटे पाच वाजल्यापासूनच बँकेच्या समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकसमोर पैसे काढण्यासाठी पहाटे पाच वाजेपासून ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, सामाजिक अंतरासाठी आखलेल्या वर्तुळामध्ये चक्क चप्पला, बूट, रुमाल ठेवून ग्राहक सावलीत बसत असल्याचे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.

येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत विविध योजनेतील अनुदान जमा झाले आहे. त्यामुळे लाभार्थींसह ग्राहक काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक सोबतच राष्ट्रीयीकृत बँकांसमोरही ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. 

हेही वाचाभूकंपाच्या धक्क्याने घाबरू नका, काळजी घ्या... कोण म्हणाले वाचा

केवळ शंभर ग्राहकांना मुभा

या गर्दीमुळे सामाजिक अंतराचे भान कोणालाही राहिले नाही. विशेष म्हणजे पोलिस विभागाकडून वारंवार सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने बँकेच्या वेळेत केवळ शंभर ग्राहकांना पैसे काढण्याची किंवा खात्यातील व्यवहार करण्याची मुभा दिली आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही

 तसेच केवळ पाच हजार रुपयेच काढता येणार आहेत. यामुळे येथे पहाटे पाच वाजल्यापासूनच बँकेच्या समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सामाजिक अंतरासाठी आखलेल्या वर्तुळामध्ये चप्पला, रुमाल, बूट ठेवून नंबर लावले जात आहेत. बँकेसमोर उन्हात लाथार्थी तापत आहेत. तसेच येथे पाणी पिण्याची व्यवस्थादेखील नसल्याचे ग्राहक सांगत आहेत.

आता शिफारस करणाऱ्यांवरही होणार कारवाई

हिंगोली : शहरात लॉकडाउन सुरू असून रस्त्यावर विनाकारण फिरण्याची परवानगी नाही. तरीही अनेक वाहनचालक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस शाखेने कारवाईची मोहीम हाती घेत ७३२ वाहने जप्त केली आहेत. मात्र, अनेक जण वाहने सोडविण्यासाठी शिफारस करीत आहेत. त्यामुळे आता शिफारस करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओंमकांत चिंचोलकर यांनी सांगितले.

येथे क्लिक कराकोरोनाबाबत उपाययोजनेचा अहवाल तातडीने सादर करा...  कोण म्हणाले वाचा

७३२ वाहने जप्त

हिंगोली शहरात आतापर्यंत वाहतूक शाखने ७३२ वाहने जप्त केली आहेत. तसेच तीन हजार २७६ वाहनांवर कारवाई करून १५ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर अनेक जण दबाव टाकून सदरची वाहने सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता त्‍यांच्यावरदेखील गुन्हे दाखल करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. 

फजिती करून घेऊ नका

वाहतूक शाखेमध्ये वाहन सोडण्यासंबंधाने शिफारशी घेऊन येणारे सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील. सर्व मेसेज व्हॉट्सॲप रेकॉर्ड करून त्याचा पुराव्याकामी वापर केला जाणार आहे. त्‍यामुळे दुसऱ्याची गाडी सोडविण्याच्या भानगडीत आपली फजिती करून घेऊ नका, जेलची हवा खाल, असे श्री. चिंचोलकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: queues have been formed for this since morning hingoli news