कोरोनाबाबत उपाययोजनेचा अहवाल तातडीने सादर करा... कोण म्हणाले वाचा

hingoli photo
hingoli photo
Updated on

हिंगोली : ग्रामपंचायत पातळीवर कोरोनाचा प्रदुर्भाव व नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा अहवाल ग्रामपंचायतीकडून गोळा करून तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी पाचही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आजघडीला रुग्ण संख्या सोळा झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन तीन मेपर्यंत असून बुधवार (ता. २९) पासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय

 कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंता निर्माण करणारी आहे.  

उपाययोजना करण्याच्या सूचना

 त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तातडीने नियंत्रण करून कोरोना संसर्गात वाढ होऊ न देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवकांनी गावातील रस्ते, नाली स्वछ ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी फवारणी करणे, खबरदारी म्हणून गावातील प्रार्थना स्थळे आदींच्या माध्यमातून लोकांना जागरूक ठेवण्यासाठी जनजागृती करणे. 

अहवाल दररोज करावा लागणार सादर

तसेच गावात बाहेर राज्यातून अथवा जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची नोंद घेणे, तसेच कोरोना प्रदुर्भाव झालेल्या व्यक्तीचा अहवाल आरोग्य विभागा मार्फत सादर करावा, आदी कामे ग्रामपंचायतीने केली असल्याचा अहवाल दररोज पंचायत समितीने गोळा करून तातडीने हा अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अहवालाकडे होतेय दुर्लक्ष

 मात्र, अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतने कोणती कामे केली याचा एकाही तालुक्यातील अहवाल पंचायत समितीच्या मार्फत सादर केला गेला नसल्याचे समोर आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तातडीने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचा अहवाल विनाविलंब जिल्हा परिषदेच्या कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

...तर होणार कारवाई

नियमित अहवाल सादर न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून तशा सूचना पंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com