सौर कृषिपंपासाठी 17 हजार शेतकऱ्यांना कोटेशन 

solar krushi pump
solar krushi pump

औरंगाबाद - शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्‍श्‍याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी होता येईल. सौर कृषिपंपांसाठी 17 हजार शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

 ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध असून यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे 64 हजार 938 शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले असून, त्यापैकी 17 हजार 16 शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आले आहेत. 

शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्‍चित झालेली कृषिपंपाची किंमत 3 एचपी डीसीसाठी 1 लाख 65 हजार 594 रुपये व 5 एचपी डीसीसाठी 2 लाख 47 हजार 106 रुपये एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी 3 एचपी डीसी पंपासाठी आधारभूत किंमत 2 लाख 55 हजार रुपये व 5 एचपी डीसी पंपासाठी 3 लाख 85 हजार रुपये होती. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी 3 एचपीसाठी 25 हजार 500 रुपये (दहा टक्के), तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना 12 हजार 725 रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे 16 हजार 560 रुपये व 8 हजार 280 रुपये एवढी भरावी लागणार आहे. तर 5 एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी 38 हजार 500 रुपये (दहा टक्के), तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना 19 हजार 250 रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे 24 हजार 710 रुपये व 12 हजार 355 रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com