esakal | राहूल गांधींच्या निकटवर्तीय खासदाराला कोरोनाची लागण; पुणे येथे उपचार सुरु

बोलून बातमी शोधा

राजू सातव

राहूल गांधींच्या निकटवर्तीय खासदाराला कोरोनाची लागण; पुणे येथे उपचार सुरु

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना या ठिकाणाहून मुंबई येथील लिलावती हाॅस्पीटलमध्ये गुरुवारी (ता. २९) हलविण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

दरम्यान, खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी गुरुवारी (ता. २२) ट्विट करुन दिली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील जहांगीर हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबई येथील लिलावती हाॅस्पीटल येथील तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील लिलावती हाॅस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - नांदेडकरांनो आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी...!

दरम्यान, राजीव सातव हे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कृषी सभापती तसेच कळमनुरी विधानसभेतुन २००९ मध्ये आमदार तर २०१४ मध्ये ते हिंगोली लोकसभा मतदार संघातुन खासदार म्हणून निवडून आले होते. युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भुषविली आहेत. राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. त्यांची गुजरात प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ते परिचित आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघात भाऊ म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे