Marathwada Flood Crisis 2025
esakal
किरण चव्हाण, माढा
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे सीना नदीला कधी नव्हे तो पूर आला, ज्याने माढा तालुक्यातील राहुलनगर गावाला पूर्णपणे वेढा घातला. अशा परिस्थितीत अनेक गावकऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चिखल आणि पाण्यातून ११ किलोमीटरची पायपीट करत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला.