गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा

गजानन आवारे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पैठण तालुक्‍यातील कापूसवाडी तांडा येथे शुक्रवारी (ता. नऊ) दुपारी दोनच्या सुमारास गावठी दारूच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात चार हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक करण्यात आली.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्‍यातील कापूसवाडी तांडा येथे शुक्रवारी (ता. नऊ) दुपारी दोनच्या सुमारास गावठी दारूच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात चार हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक करण्यात आली.

बालानगर परिसरातील कापूसवाडी तांडा येथे गावठी दारूची चोरटी विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी दुपारी दोनच्या दरम्यान छापा टाकला असता तेथे शेषराव चव्हाण हा राहत्या घरासमोर गावठी दारूची चोरटी विक्री करताना आढळून आला.

त्याच्या घरासमोरील शेतात जमिनीत लपवून ठेवलेल्या दोन पत्र्यांच्या व एका स्टिलच्या डब्यात 32 लीटर रसायन व एका प्लॅस्टिक कॅनमध्ये 8 लिटर गावठी दारू असा एकूण 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून गावठी दारू व रसायन नष्ट केले.

याप्रकरणी पोलिस नाईक जाकेर शेख यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on country side liquor