औरंगाबादेत बनावट नोटा निर्मिती अड्ड्यावर छापा

मनोज साखरे
शुक्रवार, 19 मे 2017

औरंगाबादेतील किराडपुरा-बायजीपुरा भागात बनावट नोटा निर्मितीचा अड्डा असल्याची बाब एका व्यक्तीने पोलिस विभागाला कळवली होती. या माहितीची गंभीर दखल घेवून पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकांना छापे घालण्याचे निर्देश दिले

औरंगाबाद - औरंगाबादेत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मध्यरात्रीनंतर छापा घातला. यात छपाईयंत्रासह सुमारे चाळीस हजारांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबादेतील किराडपुरा-बायजीपुरा भागात बनावट नोटा निर्मितीचा अड्डा असल्याची बाब एका व्यक्तीने पोलिस विभागाला कळवली होती. या माहितीची गंभीर दखल घेवून पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकांना छापे घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, रात्री अकरापासून पोलिस पथक किराडपुऱ्यात ठाण मांडून होते. किराडपुऱ्यातील अड्ड्यावरील हालचाली टिपून पथकाने मध्यरात्रीनंतर छापा घातला. यात एका संशयिताला पोलिसांनी पकडले. तसेच चाळीस हजारांच्या नोटा व छपाई यंत्र ताब्यात घेतले. ही कारवाई शूक्रवारी पहाटेपर्यंत सूरू होती

Web Title: Raid at fake currency center in Aurangabad