ऑनलाईन मटक्यावर छापा; चार जुगाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

नांदेड  : शहराच्या शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन मटका बुकिंगवर पोलसांनी छापा टाकला. यावेळी चार जुगाऱ्यांना अटक करून अड्ड्यावरून रोख रक्कमेसह तीस हजाराचा मुद्दमेमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. 

शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे फौजदार गोपीनाथ वाघमारे व  हवालदार मारुती तेलंग, अरुण कदम राजकुमार डोंगर, अविनाश पांचाळ असे ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग (गस्त) शनिवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास करीत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्यांनी जयभीमनगर कमानी जवळ मेघराज खंदारे यांचे पत्र्याचे घरात छापा टाकला. यावेळी या ठिकाणी एक व्यक्ती ऑनलाईन लॉटरी नावाचा मटका चालवीत होता. त्या अड्ड्यावर मटका खेळणारे तीन जुगारी थांबुन होते. पोलिसांना पाहून काही जण घटनास्थळावरून पसार झाले. परंतु पोलसांनी चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

सदरची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांना दिली. यावेळी आरोपी सोपान रमेश शेळके (वय २५), विशाल भगवान जोंधळे (वय २२), संतोष अरविंद बलखंडे (वय २१) आणि आकाश श्रावण भालेराव (वय २२) सर्व राहणार जयभीमनगर यांना अटक केली. मटका अड्ड्यावरून मटका साहित्य व नगदी असा २९ हजार ३१० रुपयाच्या ऐवज जप्त केला. या सर्व आरोपींविरूध्द गोपीनाथ वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: raid on online gamblers; four Arrested