चढ्या दराने कापसाचे बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कृषी विभागाची कारवाई; बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

पावसाने हजेरी लावताच 'बळीराजा' बियाण्यांच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करीत आहे.
Agriculture Department Pachod
Agriculture Department Pachodesakal
Summary

शेतकऱ्यांची (Farmers) होणारी लूट पाहून प्रथमच कृषी विभागाने (Agriculture Department) कारवाईचा बडगा उगारला आहे.

पाचोड : पावसाने हजेरी लावताच 'बळीराजा' बियाण्यांच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करीत आहे. ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेले बियाणे व खत विक्रेते ग्राहकांची (Pachod) दुकानांवर पडलेली झुंबड पाहून लुटीसाठी तुटून पडले असून कापसाचे काही वाण दुकानदार दामदुप्पट दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.

शेतकऱ्यांची (Farmers) होणारी लूट पाहून प्रथमच कृषी विभागाने (Agriculture Department) कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी पैठणच्या कृषी विभागाने पाचोड (ता. पैठण) सह परिसरातील दोन दुकानांवर कार्यवाही करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा वरिष्ठांना प्रस्ताव पाठवविला आहे. कृषी विभागाने मोठे मासे सोडून लहान मासेच गळाला धरल्याने ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Agriculture Department Pachod
जादा दराने कपाशी बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा; कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

रविवारी सकाळी रात्री पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने सर्वत्र मशागतीसह पेरणीकामाची लगीनघाई सुरू झाली. शेतकरी वेळेवर पेर साधण्यासाठी सर्वत्र खते व बियाण्यांच्या दुकानावर गर्दी करताना पाहायला मिळते. ग्राहकांची झुंबड पाहून दुकानदार संधीचा फायदा घेत खते व बियाण्याची दाम दुप्पट दराने विक्री करीत आहे.

Agriculture Department Pachod
Bidkin-Chitegaon Road : बिडकीन-चितेगाव मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलंचक रांगा, काय आहे कारण?

कृषी विभागाला पाचोड (ता. पैठण) येथील दुकानदार शेतकऱ्यांना दामदुप्पट दराने कापसाच्या बियाणांची विक्री करून लूट करीत असल्याची माहिती मिळाली असता जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, मंडळ अधिकारी सुहास धस, गणेश माने, राजू गावडे आदींनी सापळा रचून सर्वप्रथम पाचोड येथील बस स्थानकाजवळ असलेल्या 'गुरुमाऊली कृषी केंद्र' या दुकानावर बनावट ग्राहक पाठवून या बाबीची खात्री केली असता, साडे आठशे रुपयाची बियाण्याची पिशवी दीड हजार रुपयाला विक्री होत असल्याची खात्री पटली.

या दुकानांवर युएस ७०६७, कबड्डी, पंगा या तीन बॅग खरेदी केली. यावेळी दुकान चालकाने शेतकऱ्यास तीन बॅगाची चार हजार रुपये फोन पे वरून रक्कम घेऊन २६८० रुपयाचे बिल दिले. या दुकानदाराने चढ्या दराने बियाण्याची विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी उपरोक्त दुकानाचा पंचनामा केला व या दुकानांत सापडलेले कबड्डीचे ३६ बॅग, युएस ७०६७ चे २२ बॅग, पंगाचे ६० बॅग व अन्य एक यासह तुरीचे १६ बॅग असे एकूण १४६ बॅग कृषी विभागाने सील केले. या कारवाईची माहिती मिळताच काहीकाळ येथील दुकानदारांनी दुकानातून काढता पाय घेतला, त्यामुळे ग्राहकी टाळली. त्यानंतर कृषी विभागाचे हे पथक विहामांडवा येथे गेले व त्यांनी शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर बनावट ग्राहक पाठवून अधिक दराने बियाणे विक्री होत असल्याची खात्री करून या दुकानावर कारवाई केली. यात शंभरपेक्षा अधिक कपाशीचे पाकिटे ताब्यात घेऊन दुकान सील केले.

Agriculture Department Pachod
Maratha Reservation : '..तर मराठा समाज सरकारला धूळ चारेल'; इशारा देत मराठा बांधवांचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा

पाचोड व विहामांडवा येथील कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही दुकाना "सिल" करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंद ठेवण्याची कारवाई केली. या दोन्ही दुकानांचे बियाण्यांचे परवाने निलंबित करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी सांगितले. या कारवाईमुळे पाचोडसह परिसरातील कृषी दुकानाचे धाबे दणाणले असून कृषी विभागाने मोठमोठ्या दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य, किरकोळ दुकानदारांना आपले लक्ष्य बनवून त्यांना मोकळे सोडल्याने अधिकाऱ्यांच्या या दुजाभाव प्रकरणाबाबत जनतेनी संशयास्पद कारवाई असल्याचे सांगितले.

"व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांत दर्शनी भागात आपल्या दुकानातील उपलब्ध बियाण्याचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येते. शिवाय, याबाबत शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे. व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या किमती पेक्षा अधिक दराने बियाणे पाकीट विक्री करीत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी."

-संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, पैठण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com