नांदेड-लिंबगाव दरम्यान रेल्वे रुळात बिघाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नांदेड - उमरी रेल्वे स्टेशनजवळ नुकताच दुचाकी रेल्वे रुळावर ठेवल्याने अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (ता. २३) नांदेड - लिंबगाव स्थानक दरम्यान रेल्वे रुळावर एका ठिकाणी रुळात बिघाड झाल्याचे आढळून आले. यामुळे काही रेल्वे उशिराने धावल्या. रेल्वे विभागाने ताे बिघाड (फ्रॅक्चर) दुरुस्त करून गाड्यांची जाण्या - येण्याची व्यवस्था केली. 

मंगळवारी (ता. २३) सकाळी नऊच्या नंतर काही वेळाने लिंबगाव ते नांदेड दरम्यान रेल्वे रुळावर एका जोडणीच्या ठिकाणी बिघाड झाल्याचे रेल्वे ट्रॅकमनला दिसले. या बाबत त्याने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर त्वरित तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोचले. त्या फ्रॅक्चरची दुरुस्ती करण्यात आली. या प्रकाराने नांदेड येथून सुटणाऱ्या सचखंड आणि तपोवन उशिरा सोडण्यात आल्या. झालेला फ्रॅक्चर प्रकार घातपात आहे की नियमित जाणाऱ्या येणाऱ्या प्रभावाने घडलेला प्रकार आहे हे सांगण्यास अद्याप तरी कोणीही तयार नाही. या प्रकरणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळात नेहमीच बिघाड होत असताे. आमचे ट्रॅकमन यावर नियंत्रण ठेवून असतात. लिंबगावजवळ झालेला हा प्रकार तेवढा गंभीर नव्हता. दुरुस्तीसाठी केवळ अर्धा तास लागला. बाकी रेल्वेची ये -जा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rail problem in Nanded-Limbagan