#MarathaKrantiMorcha परभणीत रेलेरोको; जिल्हा कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

परभणी - मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंगळवारी (ता.२४) परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला. वाहतूक व दळणवळणपासून उपहागृहापर्यंत सर्व व्यवस्था ठप्प असताना सकाळी पाऊणे अकरा वाजता परभणीत रेलरोकोही करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

सोमवारी (ता.२३) पालम आणि गंगाखेड तालुका पूर्णतः बंद होता. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी, प्रवाशांना रेल्वे आणि खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागले; परंतु सकाळी पाऊणे अकरा वाजता परभणी रेल्वेस्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आले. परणामी, सचखंड एक्सप्रेस आणि आदीलाबाद-परळी रेल्वे दहा मिनीटे रोखण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुसरीकडे चुवडा (ता.पुर्णा) रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने नांदेड राज्य महामार्गवरील वाहतूक ठप्प होती. तर पालम शहरात बाजारपेठेसह शाळा, महाविद्यालये बंद होती. परभणी बाजारपेठेतील काही प्रतिष्ठाणे व दुकाने बंद करण्यासाठी युवकांनी शहरातून फेरी मारली. त्यामुळे पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात बंदोबस्तात वाढ केली. तत्पूर्वी सोमवारी रात्रीपासून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात असून ती कार्यवाही मंगळवारी करण्यात आली. तरीही महत्वाचे चौक, नाके, व्यापारी ठिकाणांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील बाजार समित्या, भाजापाला बाजार, दुकाने, प्रतिष्ठाणे पूर्णतः बंद होती. 

Web Title: rail roko in parbhani, parbhani bandh