डिसेंबरपर्यंत एक बोगी बाहेर पडावी - संभाजी पाटील निलंगेकर

लातूर - येथे रेल्वे बोगी कारखाना उभारणीचा प्रारंभ पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, अभिमन्यू पवार, रमेश कराड, आमदार विनायक पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, सुरेश पवार आदी.
लातूर - येथे रेल्वे बोगी कारखाना उभारणीचा प्रारंभ पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, अभिमन्यू पवार, रमेश कराड, आमदार विनायक पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, सुरेश पवार आदी.

लातूर - लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या रेल्वे बोगी कारखाना उभारणीच्या कामाला शुक्रवारी (ता. 12) सुरवात झाली. कामगार कल्याण, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. 25 डिसेंबरपर्यंत किमान एक बोगी तयार होऊन बाहेर पडावी, अशा पद्धतीने कारखाना उभारणी गतीने व्हावी, अशी अपेक्षा निलंगेकर यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायतीच्याही एखाद्या कामाच्या निविदा लवकर निघत नाहीत. त्यापेक्षा किती तरी गतीने रेल्वे बोगी कारखान्यासाठी निविदा काढून आता उभारणीला सुरवात झाली आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत कमी वेळात प्रकल्पाच्या कामाला सुरवात होत आहे. हा प्रकल्प लातूरलाच व्हावा, अशी रेल्वेतील काही अधिकारी, सरकारचीही इच्छा होती. मराठवाड्यासाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प असून, आजचा हा दिवस ऐतिहासिक असल्याचे निलंगेकर म्हणाले. प्रकल्पाच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर इंडस्ट्रीजचा क्‍लस्टर झोन तयार करण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल तीन नोव्हेंबरला बैठक घेणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अत्यंत कमी वेळेत प्रकल्प उभारणीला सुरवात होत आहे. कामासाठी कंत्राटादाराला दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे; पण दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, याकडे आमचे लक्ष आहे. एकाचवेळी अनेक कामे होणार असल्याने लवकरच पहिली बोगी बाहेर पडेल. प्रकल्पासोबत या ठिकाणी लहान मोठ्या इंडस्ट्रीज उभारल्या जातील, असे रेल्वेच्या वतीने मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com