रेल्वेला गंडा घालणाऱ्यांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे 
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नांदेड : हजूर साहीब रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेल्या एका मुख्य बुकींग पर्यवेक्षकाने 77 लाखाचा अपहार केला. या प्रकरणी पाच जणांवर लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी अटक केली. या सर्वांना औरंगाबाद रेल्वे न्यायालयासमोर गुरूवारी (ता. 18) हजर केले असता 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

नांदेड : हजूर साहीब रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेल्या एका मुख्य बुकींग पर्यवेक्षकाने 77 लाखाचा अपहार केला. या प्रकरणी पाच जणांवर लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी अटक केली. या सर्वांना औरंगाबाद रेल्वे न्यायालयासमोर गुरूवारी (ता. 18) हजर केले असता 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हजूर साहीब रेल्वेस्थानकावर मुख्य बुकींग पर्यवेक्षक म्हणून जी. करूणाकरण हा मागील काही वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्याकडे स्थानकावरील तिकीट बुकींग, पार्सलमधून येणारी रक्कम, आरक्षण तिकीटातून व दुकानदाराकडून येणारी दररोजची रक्कम त्याच्याकडे जमा करण्यात येते. त्याने जमा झालेली रक्कम स्वत: च्या फायद्यासाठी परस्पर हडप केली. यावरून त्यांनी मुख्य सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक बी. जॉन बेनहर (वय 42) यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. यावरून बी. जॉन हे हजुर साहिब स्थानकावर मंगळवारी (ता. सोळा) सायंकाळच्या सुमारास तपासणीसाठी आले. कार्यरत असेलेले जी. करूणाकरण यांना मला आपल्या कार्यालयातील रक्कमेबाबत तपासणी करायची आहे. यावेळी करूणाकरण यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून त्यानी केलेला अपहार लक्षात आल्याने संबंधितांना संशय आला.

तपासणीत सात ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात त्याने 77 लाख 23 हजार 343 रुपयाचा अपहार केल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एन. पी. सिंह यांनी जी. करूणाकरण, अब्दुल ईमरान, शेख फरीद, सुनीलकुमार आणि सत्यजीत दास यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी उपविभागीय अधिकारी सातव आणि पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांना तपासाच्या सुचना दिल्या. या सर्व आरोपींना गुरूवारी (ता. 18) लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Web Title: Railway police arrested two Accused