रेल्वेत नोकरी लावतो म्हणून गंडविणाऱ्याला भूवनेश्वर येथून पकडले

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

फायनान्सच्या नावाखाली एक कोटी असे चार कोटी ५७ लाखाचा गंडा घालणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी कोलकत्ता येथे सापळा लावून वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी (ता. ११) अटक केली.

नांदेड : रेल्वेत नोकरी लावतो म्हणून नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली येथील ८१ सुशिक्षीत बेरोजगारांना तीन कोटी ५७ लाख तर एका सामाजीक कार्यकर्त्यास व्यवसाय करण्यासाठी फायनान्सच्या नावाखाली एक कोटी असे चार कोटी ५७ लाखाचा गंडा घालणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी कोलकत्ता येथे सापळा लावून वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी (ता. ११) अटक केली. त्याला गुरूवारी (ता. १३) मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला ता. २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जानापूरी (ता. लोहा) सामाजीक कार्यकर्ता राजाराम मारोतराव येवले (वय ४२) यांचे कामानिमित्त वेळोवेळी मुंबईला ये- जा होती. यातूनच त्यांची राजकुमार रंजीत घोष रा. कोलकत्ता यांची ओळख झाली. या ओळखीतून श्री. येवले यांना लॉजीस्टीक ॲन्ड स्टोरेज या व्यवसायासाठी ५०० कोटीचे कर्ज मंजुर करून देण्यासाठी नितीन भुतडे व अमीत म्हेत्रे रा. मुंबई यांच्याकडे नेले. त्यांच्याशी फायनान्स करून देण्याबाबत कोलकत्ता येथील सीए सोमनाथ शिल यांच्या मार्फत त्यांना व्यवसायाला फायनान्स करण्यासाठी एक कोटी रुपये मागितले. त्यापैकी २७ लाख रुपये श्री. येवले यांनी बँकेमार्फत व ७३ लाख रुपये रोख स्वरुपात दिले. मात्र फायनान्स मंजुर झाले नाही. हा प्रकार एक जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात झाला. 

हेही वाचा ‘प्रेमी युगुलां’च्या प्रेमाला आज येणार बहर

८१ बेरोजगारांकडून तीन कोटी ५७ लाख

या दरम्यान आरोपी राजकुमार रंजीत घोष, देवेंद्र शहा, एम. एन. सिंग, राहूल शहा यांनी राजाराम येवले यांना आम्ही ईस्टर्न रेल्वे बोर्ड कोलकत्ता व रेल्वे बोर्ड दिल्ली येथे ग्रुप सीमध्ये टीसी, बीसी, सीसी व ग्रुप डीमध्ये ट्रेसमन, गॅंगमन, शिपाई या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. यातून राजाराम येवले यांच्या मार्फत नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील ८१ बेरोजगाराकंडून तीन कोटी ५७ लाख रुपये बँकेमार्फत घेतले. त्यांना लखनौ आणि मुजफ्फरपूर या ठिकाणचे नोकरीचे आदेश दिले. परंतु कोलकत्ता येथे गेल्यानंतर हे आॅर्डर बनावट असल्याचे त्यांना समजले. 

येथे क्लिक करा नांदेडच्या महिलांना का होतो सासुरवास, वाचा कारणे...

भुवनेश्‍वर येथून अटक

आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजाराम येवले यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुरूवारी (सहा) फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. हा तपास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलिस अधीक्षक श्री. मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांच्या मार्दर्शनाखाली पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी आपले सहकारी फौजदार सुभान केंद्रे यांच्‍या पथकाला कोलकत्ता येथे पाठविले. या पथकाने भुवनेश्‍वर येथून देवेद्र जगदीश शहा याला सोमवारी (ता. १०) रोजी अटक केली. गुरूवारी (ता. १३) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला नऊ दिवस (ता. २१) पर्यंत पोलिस कोठडी दिली.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Recrut Froad Nanded crime news