रेल्वेमार्गामुळे ‘निलंगेकर’झळकणार देशपातळीवरील नकाशावर, ७२ वर्षांपासूनच्या मागणीला यश

राम काळगे
Thursday, 26 November 2020

गेल्या ७२ वर्षांपासून (निजामकाळापासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला अखेर माजी मंजुरी मिळाली आहे. या नव्या (माणिकदंड) रेल्वे मार्गामुळे लातूर रोड ते शिरूरअनंतपाळ, निलंगा, उमरगा मार्गे गुलबर्गा हा मार्गा सोईचा होणार आहे.

निलंगा (जि.लातूर) : गेल्या ७२ वर्षांपासून (निजामकाळापासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला अखेर माजी मंजुरी मिळाली आहे. या नव्या (माणिकदंड) रेल्वे मार्गामुळे लातूर रोड ते शिरूरअनंतपाळ, निलंगा, उमरगा मार्गे गुलबर्गा हा मार्गा सोईचा होणार आहे. शिवाय राजकारणासाठी नावलौकिक असलेल्या निलंगा हे गाव नव्या विकासासाठी आता देशपातळीवर झळकणार आहे.

तत्कालीन मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान  विकास हवा असेल तर त्यासाठी दळणवळणाची सुविधा असणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर वजन वापरून त्यांनी सुरवातीला जाहिराबाद- लातूर या राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर निजाम काळापासून लातूर रोड ते शिरूर अनंतपाळ (माणिक दंड) मार्गे निलंगा, उमरगा, गुलबर्गा अशा या रेल्वेमार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. शिवाय याबाबतचे सर्वेक्षण झाले होते. त्यातच तत्कालीन खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ही दक्षिण भाग रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी हा रेंगाळलेला प्रस्ताव लोकसभेमध्ये आवाज उठून ऐरणीवर आला होता.

तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी याबाबत नोंद घेऊन  रेल्वेमार्ग मंजुरी बाबत असे आश्वासन दिले होते.  वास्तविक पाहता हा रेल्वेमार्ग यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळत राहिला. त्यातच श्री.निलंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीत निलंगा येथे आलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासमोर जोपर्यंत निलंगा मतदारसंघातून रेल्वे जाणार नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्विकारणार नाही असे वचन दिल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तेव्हा रेल्वेमंत्री गोयल यांनी निलंगेकरांनी लातूरसाठी रेल्वे बोगी कारखाना मागीतला तो दिला. 

त्याच्या पूर्तीसाठी एक पाऊल पुढे जात गुलबर्गा ते लातूर रोड या दरम्यान १८७ किलोमीटर अंतरावरील रेल्वेमार्गा निर्मितीसाठीच्या सर्वेचे काम सुरू झाले आहे.
रेल्वे विभागाचे अधिकारी नाही. प्रशासकीय पातळीवर सर्वेक्षणाची तयारी सुरू केली असून चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उमरगा या भागातील जवळपास सात कृषी उत्पन्न बाजार समित्या विविध तालुके या माध्यमातून नव्या रेल्वेमार्गामुळे दळणवळणाची सुविधा व विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या मार्गाचे तांत्रिक सर्वे यापूर्वीच झाले. नव्या रेल्वेमार्गामुळे  'निलंगा' हे गाव राजकारणाबरोबरच विकासाच्या देशपातळीवरील नकाशावर झळकणार आहे. शिवाय तांत्रिकदृष्या शिरूर अनंतपाळ, निलंगा, कासारसिरशी हा मार्ग सोईचा राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांत मोठा आनंदोत्सव केला जात आहे.
.........
दक्षिण भाग जोडण्यासाठी हा सर्वात जुना निजामकालीन सर्वे असून माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी सन २००५ ला रेल्वे मंत्र्याकडे मागणी केली होती. निलंगा व परिसरातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. भैय्यानी वारंवार याबाबत पाठपुरावा केला असून बाजार समित्या, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सर्व बाबीचा विचार करून हा मार्ग महत्त्वाचा आहे.
अरविंद पाटील निलंगेकर, युवा नेते
........
संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Will Connect To Nilanga Latur News