थंडी, उन्हातही कामगारांचा कोयता ऊसतोडीच्या कामाला; चिमुकल्यांसाठी फाटक्या कपड्याचा आडोसा

Sugar cutting Laboureres Lives
Sugar cutting Laboureres Lives
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने सर्वत्र ऊसाच्या फडात ऊसतोड कामगार कामाला लागले आहेत. ऊसतोड कामगार घर सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह ऊसाच्या फडात घाम घाळत आहेत. दरम्यान आभाळाच्या छताखाली ऊसाच्या पाचोट्यात फाटक्या कपड्याचा आडोसा करून लहानग्या बाळांची सोय केल्याचे चित्र दिसून येत आहे.समाजात गरीब-श्रीमंताची विषमतेची दरी रुंदावतच चालली आहे. देशातील सधन शेतकरी, शासकीय कर्मचारी, व्यापारी व राज्यकर्त्यांची मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या अलिशान शाळेच्या लाखो रूपयाची देगणी देऊन प्रवेश घेतात.

दुसरीकडे उदरनिर्वाहासाठी नेहमी स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मुलांसाठी मात्र परिपूर्ण सुविधा नसलेल्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. साखर शाळेचा दिलासा असला तरी मुलेही आई-वडिलांना कामांसाठी मदत करण्यासाठी ऊस फडात जात असल्याचे चित्र दिसते आहे. यंदा लॉकडाऊनमुळे शाळांचे सात महिने वर्ग भरले नाहीत. ऑनलाईन शिक्षणासाठी बऱ्याच गरीब कुटुंबाच्या मुलांच्या हातात मोबाईल नाही. शिक्षणाविषयीच्या संभ्रमात असलेले लहानग्या मुलांना ऊसाच्या फडात तात्पुरत्या निवाऱ्यात राहवे लागते.

ऊसतोड कामगार ऊन थंडीची झळ सोसस हातातील कोयताने ऊसाचा फड पूर्ण करण्याच्या कामात व्यस्त असतो. चिमुकल्या बाळाचाही निवारा फडातच असतो. ऊसतोड महिला आपल्या कामावर मग्न असते. चिमुकला बाळाचे रडणे ऐकू आले की, त्याला भूक लागल्याची जाणीव आईला होते. ऊसाच्या फडातच एखाद्या फाटक्या चिंधीचा पाळणा करून तेथेच बाळाला दूध पाजविले जाते. दरम्यान एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्याची भाषा केली जाते आहे तर दुसरीकडे मजूरांना आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नांकडे केवळ पाहात राहवे लागत आहे.


ऊसतोडीची आधुनिक सामुग्री आली तरी ... कोयताच महत्त्वाचा !
यंदा ऊसाचे क्षेत्र बरेच असल्याने ऊसतोडीसाठी कामगारांची टोळी शिवारा- शिवारात दिसत आहे. काही साखर कारखान्यांनी ऊसतोडीसाठी आधुनिक यंत्रसामुग्री असलेल्या कंत्राटदाराशी करार केल्याने उमरगा तालुक्यात बऱ्याच फडात आधुनिक यंत्रसामुग्री दिसत आहे. मात्र यासाठी बऱ्याच मर्यादा असल्याने कामगारांचा कोयताच ऊसतोडीसाठी महत्त्वाचा ठरतो आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com