औरंगाबादेत बारा तासात १७.२ मिमी पाऊस

आदित्य वाघमारे
बुधवार, 31 जुलै 2019

राज्यात पावसाने झाड लावलेली असताना मराठवाड्याच्या राजधानीत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेआठ ते बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेआठपर्यंत १७.२ मिलिमीटर पावसाची नोंद येथे झाली.

औरंगाबाद - राज्यात पावसाने झाड लावलेली असताना मराठवाड्याच्या राजधानीत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेआठ ते बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेआठपर्यंत १७.२ मिलिमीटर पावसाची नोंद येथे झाली. 

राज्यात जोरदार पाऊस सुरू असताना औरंगाबादेत मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात सर्वत्र झड लागलेली असताना औरंगाबादेत मात्र रिमझिम सुरू आहे. मंगळवारी (ता. ३०) दिवसा उघडीप दिल्यावर, रात्री मात्र रिमझिम पाऊस सुरू राहिला. जोर नसला तरी या पावसात सातत्य असून औरंगाबादेत बारा तासात १७.२ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. त्यानंतरही पाऊस सुरूच होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Aurangabad Water