बीड जिल्ह्यात जलसमृद्धी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

बीड - गेल्या आठ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 144 पैकी 2 मोठे, 11 मध्यम आणि 103 लघु, असे एकूण 116 सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत तसेच विविध सेवाभावी संस्थांतर्फे राबविण्यात आलेल्या जलसंधारण कामांतही पाणीसाठा उपलब्ध झाल्याने आजघडीला जिल्ह्यात जलसमृद्धीचे चित्र दिसत आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 666.36 मिमी आहे. या तुलनेत आतापर्यंत 108 टक्के इतका पाऊस झाला आहे. गेल्या एकाच आठवड्यात जवळपास सरासरी 398 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा वाढत आहे. माजलगाव प्रकल्पामध्ये 312 दलघमी तर मांजरामध्ये 176 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय गोदावरी खोऱ्यातील 10 आणि कृष्णा खोऱ्यातील 6, असे एकूण 16 मध्यम प्रकल्प असून त्यापैकी गोदावरी खोऱ्यातील 10 तर कृष्णा खोऱ्यातील एक, असे 11 मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

उर्वरित 5 पैकी 1 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 2 प्रकल्प 25 ते 50 टक्के भरले असून एक प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून एक प्रकल्प पूर्णपणे कोरडा आहे.  जिल्ह्यात एकूण 126 लघु सिंचन प्रकल्प असून त्यापैकी 103 लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. 2 प्रकल्प 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, 5 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 3 प्रकल्प 25 ते 50 टक्के, 1 प्रकल्प 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी भरले असून 8 प्रकल्पांत अद्याप जोत्याखाली पाणी आहे. याशिवाय लोणी, पिंपळा, पारगाव (जो) क्रं.1 आणि क्रं.2 हे चार लघु प्रकल्प कोरडे आहेत. 144 प्रकल्पांमध्ये आजघडील एकूण 839.45 दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असून प्रकल्पीय क्षमतेच्या तुलनेने याची टक्केवारी 94.45 टक्के इतकी आहे. 

Web Title: rain in beed