बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

बीडमध्ये साधारण १५ मिनीटे पावसाच्या सरी झाल्या. तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. परळी व गेवराईसह परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

बीड -  बीडसह जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी (ता. ३०) सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात काढून टाकलेल्या खरीप पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. 

सोमवारी दुपारच्या दरम्यान वातावरणात बदल झाला. त्यानंतर हळुहळू आकाशात ढग जमा झाले. सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान पावसाने हजेरी लावली. बीडमध्ये साधारण १५ मिनिटे पावसाच्या सरी झाल्या. तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. परळी व गेवराईसह परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळ आणि अवकाळी पावसामुळे शेतात काढून टाकलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसह आंब्यासह इतर फळपिकांचे नुकसान झाले. 

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

सिरसाळात पावसाची हजेरी 

सिरसाळा : अवकाळी पावसाने सिरसाळ्यात सोमवारी (ता.३०) सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा जोरदार हजेरी लावली. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. विजेचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे अर्धा तास हा पाऊस झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, कडबा, गहू, हरभरा या पिकांना पुन्हा फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे सांगितले. या पावसाने अनेक ठिकाणी रोडवर झाडे कोलमडून पडल्याचे चित्र आहे. तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Beed district