हिंगोली : येलदरी धरण फुल्ल

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

येलदरी धरण भरल्यामुळे त्याचा फायदा सिद्धेश्वर धरणाला होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. ८) येलदरी धरण फुल्ल झाले आहे. ते भरल्यामुळे आता कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंगोली : येलदरी धरण भरल्यामुळे त्याचा फायदा सिद्धेश्वर धरणाला होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. ८) येलदरी धरण फुल्ल झाले आहे. ते भरल्यामुळे आता कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावरून पाणी सोडल्यानंतर सिद्धेश्वर धरणामध्ये पाणीसाठा होतो. पूर्णा नदीच्या पात्रातून येणारे पाणी सिद्धेश्वर धरणामध्ये साठवले जाते. मागील काही वर्षात अपुरा पाऊस झाल्यामुळे येलदरी धरणामध्ये पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातही कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते.

तसेच यावर्षी उन्हाळ्यामध्ये सिद्धेश्वर धरण मृत साठ्यात गेले होते. मात्र अपुरा पाऊस लक्षात घेऊन धरण भरणार की नाही अशी भीती व्यक्तीकडे जवळ आली होती मात्र मध्ये झालेल्या पावसाने खडकपुर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणाचे पाणी येलदरी धरणात सोडण्यात आल्याने येलदरी धरण भरू लागले आहे.

सध्या धरणांमध्ये अडीच हजार क्‍युसेक पाणी येऊ लागले आहे. शुक्रवार सकाळी येलदरी धरण 95 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याचा युवा लक्षात घेता येलदरी धरणावरील वीज निर्मिती सुरू करून त्यासाठी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने येलदरीचे पाणी पूर्णा नदीतून सिद्धेश्वर धरणात येऊ लागले आहे.

दरम्यान, आजच्या स्थितीत सिद्धेश्वर धरण 22 टक्के भरले आहे. पुढील काही दिवसातच येलदरीचा पाणीसाठा वाढल्यास कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून सिद्धेश्वर मध्ये पाणी सोडले जाणार असल्याचे पुर्णा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain flooded Yaldari dam full