'सेन्सर'द्वारे पावसाची अचूक माहिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - दिवसातून दोनदा पर्जन्य मोजून त्या आधारावर धरणांना चालवणे लवकरच कालबाह्य होणार आहे. सुमारे 25 वर्षे जुनी असलेली ही यंत्रणा मोडीत काढून स्वयंचलित सेन्सर गोदावरी खोऱ्यातील पर्जन्याची माहिती क्षणाक्षणाला देणार आहेत. मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात 280 ठिकाणी हे "सेन्सर' लावण्यात येणार असून, यामुळे केव्हाही पर्जन्याची माहिती घेता येणार आहे. सकाळी साडेआठ आणि सायंकाळी साडेपाचला पावसाची नोंद घेण्याऐवजी आवश्‍यक त्या क्षणाला किती पाऊस झाला आणि निसर्गाशी निगडित अन्य मापदंडांची थेट माहिती राज्याच्या जलस्रोत कार्यालयाला मिळू शकणार आहे. सध्या गोदावरी खोऱ्यात होणारा पाऊस मोजण्यासाठी 180 ठिकाणी मानवचलित यंत्रे कार्यरत आहेत. या 180 ठिकाणांची संख्या आता 280 वर जाणार आहे.
Web Title: rain information by sensor