मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

त्याचबरोबर, उस्मानाबाद तालुक्‍यासह, लातूर जिल्ह्यातील लातूर, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात दमदार पावसाची हजेरी लागली. या पावसामुळे प्रतीक्षेत असलेल्या खरिपाच्या पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री मंडळात 3 मिमी, पीरबावडा 12, सोयगाव 15, सावलदबारा 1, पिशोर 2, चापानेर 5 तर सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद करंजखेडा महसूल मंडळात झाली.

औरंगाबाद - मराठवाड्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर शनिवार (ता.8) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जवळपास तीस तालुक्‍यांत हलका, मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जालना, लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ मंडळात 80 मिलिमीटर पावसाची नोंद घेतल्या गेली.

मराठव्यात जवळपास 71 टक्‍के पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीनंतर पावसाने काही ठिकाणी पंधरवडा तर काही ठिकाणी तीन आठवड्यांचा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी हजेरी लावलेल्या पावसाने शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाची हजेरी लावली.

मराठवाड्यातील 76 पैकी जवळपास तीस तालुक्‍यांत शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात 40.67 मिलिमीटर, लातूर तालुक्‍यात 29 मिलीमिटर, उस्मानाबाद तालुक्‍यात 14.38 मिलमिटर, परतूर तालुक्‍यात 20 मिलिमीटर, घनसावंगी तालुक्‍यात 20.29 मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली. जालना जिल्ह्यात परतूर, घनसावंगी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता.

त्याचबरोबर, उस्मानाबाद तालुक्‍यासह, लातूर जिल्ह्यातील लातूर, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात दमदार पावसाची हजेरी लागली. या पावसामुळे प्रतीक्षेत असलेल्या खरिपाच्या पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री मंडळात 3 मिमी, पीरबावडा 12, सोयगाव 15, सावलदबारा 1, पिशोर 2, चापानेर 5 तर सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद करंजखेडा महसूल मंडळात झाली.

Web Title: rain in marathwada