परभणी शहरासह जिल्ह्यात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. ज्या ठिकाणी जलयुक्तची कामे झाली आहेत, त्या ठिकाणी नाले भरून वाहत आहेत.

परभणी : परभणी शहरासह सर्वच तालुक्यात मंगळवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी वर्ग कामाला लागला आहे.

मंगळवारी (ता.५) पहाटे परभणी सह आजू बाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर परत रात्री उशिरा मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पालम तालुक्या च्या दक्षिणेस पावसाचा जोर राहिल्याने पालम तालुक्यातील गालाठी नदी भरून वाहत होती.

या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. ज्या ठिकाणी जलयुक्तची कामे झाली आहेत, त्या ठिकाणी नाले भरून वाहत आहेत.

Web Title: rain in Parbhani

टॅग्स