उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा) परिसरात दमदार पाऊस झाला.

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा) परिसरात दमदार पाऊस झाला.

मृग नक्षत्राला सुरवात झाल्यानंतर गुरुवारी (ता. 7) पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद शहर व परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्धातास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तेर (ता. उस्मानाबाद), अनाळा (ता. परंडा) येथे सकाळी अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा) परिसरात रात्रभर पाऊस सकाळी नऊपर्यंत हा पाऊस सुरू होता. उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरात गुरुवारी पहाटे एकपासून तासभर दमदार पाऊस झाला. त्यानंतर सकाळी सहा ते आठपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

बलसूरसह परिसरातील कडदोरा, निंबाळा, एकुरगा, व्हंताळ, जकेकुर, रामपूर, येळी,वाडी आदी भागांत सकाळपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरील लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत. हा पाऊस पेरणीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या पावसामुळे कडदोरा परिसरातील ओढ्यातून पाणी वाहत होते.

Web Title: rain in usmanabad district