जलमय धरा, नयनरम्य आसमंत...

विशाल अस्वार
रविवार, 1 सप्टेंबर 2019

वालसावंगी (जि.जालना) - परिसरात शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा शेतशिवारात चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे; शिवाय जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलमय धरा आणि नयनरम्य आसमंत असे शनिवारी (ता. 31) चित्र होते.

भोकरदन तालुक्‍यात शुक्रवारी मध्यरात्री वालसावंगीसह धावडा, विझोरा, वाढोणा, जयदेववाडी, सुंदरवाडी, पद्मावती येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा मोठा जोर होता, दोन-तीन तास पाऊस सुरूच होता. 

काही दिवसांपूर्वी नदी-नाले खळखळून वाहत होते; मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे खळखळाट थांबला होता. आता शुक्रवारी तसेच शनिवारी पडलेल्या पावसामुळे नदी-नाले पुन्हा वाहू लागले आहेत. शिवाय पाझर तलाव, खदानी, विहिरीतील जलसाठ्यांत मोठी वाढ झाली आहे. शेततळीसुद्धा तुडुंब भरली आहेत. दरम्यान, शनिवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. 

पिकांना मिळाली संजीवनी 
पावसाने उघडीप दिल्याने बहरलेल्या पिकांना पावसाची मोठी गरज होती. खासकरून मका व सोयाबीन पिकाला. पिके पावसाअभावी सुकून चालली होती; मात्र काल रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे पिकांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली असून, शेतशिवार पुन्हा एकदा बहरून आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Walsawangi