आठ परिमंडळांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

औरंगाबाद - दोन दिवसांपासूनच्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी (ता. २३) मराठवाड्यात आठ जिल्ह्यांपैकी परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत विभागातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

जूनच्या प्रारंभापासून मराठवाड्यात पावसाची कृपादृष्टी होती. ११ जूनला मराठवाड्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी झाल्यानंतर १२ ते २० जूनदरम्यान पाऊस गायब झाला; मात्र दोन दिवसांपासून पावसाने कमबॅक केले असून, शनिवारी सकाळपर्यंत परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. 

रविवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड (९६ मिमी), फुलंब्री (८० मिमी), नांदेड जिल्ह्यातील सरसम (६९ मिमी), बीड जिल्ह्यातील पाटोदा (७० मिमी), थेरला (१३० मिमी), दासखेडा (७२ मिमी), दौलावडगाव (९८ मिमी) व अंबाजोगाई (६८ मिमी) येथे अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १४.५६ मिमी, जालना-३.१८ मिमी, परभणी- १२.३३ मिमी, हिंगोली -१५.७५ मिमी, हिंगोली ग्रामीण - नऊ, नांदेड - १०.०३ मिमी, बीड - २४.३३ मिमी, लातूर-१६.१६ आणि उस्मानाबाद - ११.६८ मिलिमीटर पाऊस झाला. 

जूनच्या सुरवातीपासूनच लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात एकीकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला.

सरासरीच्या तुलनेत 
झालेला पाऊस
जिल्हा    पाऊस 

औरंगाबाद    ७९ टक्‍के
जालना    ८६  टक्‍के
परभणी    १५३ टक्‍के
हिंगोली    १५९ टक्‍के
नांदेड    १६७ टक्‍के
बीड    १२२ टक्‍के
लातूर    २०६ टक्‍के
उस्मानाबाद    १३७ टक्‍के

Web Title: rain water