इंद्रधनुष्य महोत्सवात मुंबई विद्यापीठ विजेते 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने बाजी मारत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपविजेते ठरले. मुंबईने 16, औरंगाबादने 14, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाने 10 पारितोषिके पटकावली. 

औरंगाबाद - इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने बाजी मारत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपविजेते ठरले. मुंबईने 16, औरंगाबादने 14, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाने 10 पारितोषिके पटकावली. 

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचा बुधवारी (ता. 9) समारोप झाला. अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. बीसीयूडीचे संचालक डॉ. सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. "इंद्रधनुष्य' ही वेगवेगळ्या 24 कला प्रकारांत स्पर्धा झाली. सर्वसाधारण विजेते मुंबई विद्यापीठ वेगवेगळ्या गटांत दोन फिरत्या चषकांचे मानकरी ठरले. संगीत आणि नाट्य गटात मुंबई विद्यापीठाने बाजी मारली. नृत्य गटात मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने पारितोषिक मिळवले. वाङ्‌मय गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच ललित कला गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ उत्कृष्ट ठरला. 

मुंबई विद्यापीठातील रोहन कोटेकर उत्कृष्ट विद्यार्थी ठरला. 

अमृता खानविलकर यांना चक्‍कर 
पुरस्कार वितरणासाठी आलेल्या अमृता खानविलकर यांनी एका विद्यार्थिनीच्या आग्रहास्तव "वाजले की बारा...' लावणीवर नृत्य केले. त्यानंतर त्या पुरस्कार वितरणासाठी उभ्या राहिल्या. या वेळी त्यांना व्यासपीठावरच दोनदा चक्‍कर आली. विद्यार्थ्यांना पुरस्कार न देताच त्या हॉटेलवर परतल्या. वेळेत जेवण न झाल्याने चक्‍कर आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Rainbow Festival in Mumbai University Winners