इचलकरंजीत जूना पूल पाण्याखाली

पंडित कोंडेकर
शनिवार, 14 जुलै 2018

पालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदीकाठावर अग्नीशमन दलासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी आदी व्यंकटराव शाळेत छावणीची व्यवस्था केली आहे. जून्या पूलावरील वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली असून हुपरीकडे जाण्यासाठी नव्या पूलाचा वापर केला जात आहे.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून यावर्षी पहिल्यांदा जूना पूल काल रात्री पाण्याखाली गेला आहे.

आज सकाळी पाण्याची पातळी ६२ फूटावर पोहचली असून हळूहळू पूर परिस्थीती निर्माण होत आहे. वरद विनायक मंदीर तसेच स्मशानभूमी परिसरात नदीपात्रातील पाणी आले आहे. पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता कायम राहिल्यास पूराचे पाणी नागरी वस्तीत येण्याची शक्यता आहे.

पालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदीकाठावर अग्नीशमन दलासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी आदी व्यंकटराव शाळेत छावणीची व्यवस्था केली आहे. जून्या पूलावरील वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली असून हुपरीकडे जाण्यासाठी नव्या पूलाचा वापर केला जात आहे. इचलकरंजीत ६८ फूट इशारा तर ७१ फूट धोका पातळी आहे.

Web Title: rainfall in Ichalkaranji