esakal | बीड : पाटोदा तालुक्याला पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान । RAIN
sakal

बोलून बातमी शोधा

बीड : पाटोदा तालुक्याला पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान

बीड : पाटोदा तालुक्याला पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटोदा: तालुक्यात यंदा मागील काही दिवसांपासुन पावसाने अक्षरशः थैमान घातले असुन चारही महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, मागील वर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा या वर्षी आतापर्यंन चौपट पाऊस पडला असुन सोमवार पासून पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केल्याने अजुनही पावसाचे थैमान सर्वत्र सुरूच असून, शेतीचे व पिकांचे प्रचंड नुकसान असून सोयाबीनचे काढणीला आलेले पिक पाण्याखाली गेले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

पाटोदा तालुक्याचे एकुण वार्षिक पर्जन्यमान सरासरी 601 मी. मी. इतके असुन यंदा त्यातुलनेत सर्वत्र अधिक पाऊस झाला आहे व पावसाळा संपायला अजुन अवधी असल्याने जर असाच पाऊस सुरू राहिला तर नुकसानीमुळे हाहाःकार उडण्याची शक्यता आहे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून सोमवार(ता.27) पर्यंत तालुक्यात एकूण 730 मी.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये पाटोदा 706 मी.मी., दासखेड 803 मी.मी., थेरला 650 मी. मी., अंमळनेर 762 मी. मी. याप्रमाणे पावसाची नोंद होती.

loading image
go to top