'या' बँकेकडून कर्मचाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती

प्रकाश बनकर
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

बँकिग क्षेत्रात राज्यातील 17 जिल्ह्यात सेवा देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवण्यिात येतात. पाणी टंचाई व घटती जलपातळीविषयी इतरांना जागृत करण्याच्या उपक्रम स्वत:पासून करण्याचा निर्णय महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे घेण्यात आला.

औरंगाबाद : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे. यावर सरकारतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. याच जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पुढाकार घेतला आहे. स्वत:चे घर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जलफेरभरणासाठी घराच्या छतावर रेनवॉटर हार्वेस्टिग बसविण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्यांचा 15 ऑगस्टला सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र काबरा यांनी दिली. 

बँकिग क्षेत्रात राज्यातील 17 जिल्ह्यात सेवा देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवण्यिात येतात. पाणी टंचाई व घटती जलपातळीविषयी इतरांना जागृत करण्याच्या उपक्रम स्वत:पासून करण्याचा निर्णय महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे घेण्यात आला. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची स्वत:ची घरे आहेत. त्यांना रेनवॉटर हार्वेस्टीग सक्‍तीचे करण्यात आले आहे. यानुसार कर्मचाऱ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टीगचा करण्यास सुरुवात केली आहे. बँकेचे 413 शाखेत 1650 कर्मचारी आहेत. याच कर्मचाऱ्यातर्फे रेनवॉटर हार्वेस्टीग करण्याचा संकल्प केला असल्याचेही काबरा यांनी सांगितले. 

कोणत्याही गोष्टीची माहिती इतरांना देण्या अगोदर त्यांचा स्वत: अवलंब करणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही जलफेरभणासाठी जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना रेनवॉटर हार्वेस्टिग करण्याच्या सूचना केल्या असल्याचेही काबरा यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainwater Harvesting forced by this bank