भर पावसाळ्यात परभणीत 32 टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

परभणी : पावसाळा सुरु होऊन 19 दिवस झाले असले तरी अद्याप पाणी परतले नसल्याने परभणी जिल्ह्यातील 22 गावे व 13 वाडी-तांड्यावर 32 टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. तर 191 गावात 220 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात यंदाच्या जानेवारी महिन्यापासून पालम, गंगाखेड आणि पूर्णा, जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. मे महिन्यात एकूण 42 टॅंकर सुरु होते. जूनच्या पहिल्या अठवड्यात पूर्णा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या तालुक्यातील 10 टॅंकर बंद झाले आहेत. मात्र पालम, गंगाखेड, जिंतुर आणि सेलु तालुक्यातील टॅंकरची स्थिती कायम आहे. सद्यस्थितीला पालम तालुक्यात 12, गंगाखेड तालुक्यात 10, सेलुमध्ये 4 आणि जिंतुर तालुक्यात 5 टॅंकर सुरु आहेत. तर 163 गावात 220 विहीरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात एक ते दहा जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला खरा मात्र जमिनीतील पाणी पातळी वाढेल असा पाऊस सर्वच तालुक्यात झाला नसल्याने पाणी टंचाई कायम आहे. विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
 
Web Title: in rainy season parbhani needs 32 water tanker