राजेश टोपेंची शरद पवारांना साथ

   Rajesh Tope With Sharad Pawar
Rajesh Tope With Sharad Pawar
Updated on

घनसावंगी (जि. जालना) - राष्ट्रवादी विधीमंडळाच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षात फूट पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा कोण आमदार कोणाबरोबर याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आमदार राजेश टोपे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, मुबंईतील पत्रकार परिषदेत श्री. टोपे हे शरद पवार यांच्या सोबत उपस्थितीत होते. त्यामुळे टोपे शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार टोपे व त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे कॉग्रेसपासून शरद पवार यांचे निष्ठावान आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना केल्यानंतरही टोपे कुटुंब त्यांच्या सोबत आहेत. सलग अठरा वर्ष आमदार राजेश टोपे यांनी मंत्रीडळात कॅबीनेट मंत्री म्हणून काम पहिले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जालना जिल्ह्यात टोपे हे अंत्यत अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. मात्र, राज्यातील सत्तापेचात ते कोणता निर्णय घेतात. याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती होती. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत राहतील, असे चित्र आहे. 

अजित पवार टोपेंवर नाराज असल्याची चर्चा
परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या घनसावंगी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना मताधिक्य मिळाले नव्हते. यावरून अजित पवार टोपे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा देखील होती. त्यामुळेच  विधानसभा निवडणूकीत राजेश टोपे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसी अजित पवार यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला होता.  त्यामुळे राजेश टोपे हे शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करीत असल्याचे सूत्राकडून कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com