नागरी सुविधांसाठी औरंगाबाद महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा 

माधव इतबारे
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद : प्रत्येक आठवड्याला औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता.12) दुपारी महापालिका मुख्यालयावर राजीवनगर (रेल्वेस्टेशन परिसर) येथील नागरिक, महिलांनी हल्लाबोल मोर्चा काढला. महापालिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली. 

राजीवनगर भाग अत्यंत गलिच्छ असून, या ठिकाणी महापालिकेमार्फत कुठलीही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे लहान मुले, वृद्ध वारंवार आजारी पडत आहेत. नागरी सुविधांसाठी वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून उपयोग होत नसल्याने नागरी कृती समितीने दुपारी महापालिकेवर धडक घेतली. हल्ला बोल.. हल्ला बोल...च्या घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. 

Web Title: rally on aurangabad municipal corporation for civic amenities