धनगर आरक्षणासाठी काठी अन्‌ घोंगडं मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

बीड - हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी असा धनगर समाजाचा पारंपरिक पेहराव असलेले आणि डोक्‍यावर पिवळ्या टोप्या परिधान करून हाती पिवळ्या रंगाचे झेंडे उंचावत आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत समाजबांधवांचा मोर्चा सोमवारी (ता. 17) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

संबळ वाजवत विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. यशवंत सेनेच्या पुढाकाराने काढलेल्या मोर्चात समाजातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी निदर्शने आणि घोषणा देण्यात आल्या. हक्काच्या आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवले जात आहे, सत्तेत आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाची घोषणा करणाऱ्या सरकारने समाजाची फसवणूक केली आहे.

समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या टीस संस्थेने अहवाल देऊन दोन वर्षे उलटली तरी त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली.

Web Title: Rally for Dhangar Reservation