मिरवणुकीत तलवारीसह शायनिंग; एकास अटक

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १९) काढलेल्या दुचाकी फेरीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करत एका तरुणाने चांगलीच शायनिंग मारली.
crime
crime sakal
Summary

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १९) काढलेल्या दुचाकी फेरीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करत एका तरुणाने चांगलीच शायनिंग मारली.

बीड - महापुरुषांच्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary)) शनिवारी (ता. १९) काढलेल्या दुचाकी फेरीत (Rally) हातात तलवार (Sword) घेऊन स्टंटबाजी करत एका तरुणाने (Youth) चांगलीच शायनिंग मारली. याबाबत सोशल मीडियावरुन (Social Media) व्हायरल झालेल्या मिरवणुकीतील फोटोवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. २०) शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत एकास अटक (Arrested) करून कोठडीत रवानगी केली.

गणेश ऊर्फ टिनू गोरख शिराळे (२२, रा. स्वराज्यनगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी शिवरायांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या फेरीत दुचाकीवर मागे उभे राहून हातात तलवार घेऊन गणेश शिराळे याने हे कृत्य केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. याचे छायाचित्र सोशलमीडियावर व्हायरल झाले होता.

crime
बीड : जमीन घोटाळा तपासाचा गृहमंत्री घेणार आढावा

दरम्यान, ता.२० रोजी देखील तलवार जवळ बाळगून ‘तो’ दहशत निर्माण करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, विकास वाघमारे, मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, रामदास तांदळे यांचे पथक रवाना केले. बार्शी रोडवरील एका खासगी हॉस्पिटलसमोरुन सायंकाळी गणेश ऊर्फ टिनू गोरख शिराळे यास धारदार तलवारीसह ताब्यात घेण्यात आले. जमादार मनोज वाघ यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com