Ramadan Eid : आडुळ येथे ईद उल फिञ मोठ्या उत्साहात साजरी, सकाळ विशेष पुरवणीने आनंद व्दिगुणित

आडूळ, ता. पैठण येथे बुधवारी (ता. ११) रोजी रमजान ईद ( ईद- उल - फिञ ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Ramadan Eid celebration in aadul village
Ramadan Eid celebration in aadul villagesakal

आडूळ - आडूळ, ता. पैठण येथे बुधवारी (ता. ११) रोजी रमजान ईद ( ईद- उल - फिञ ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता येथील जामा मस्जीद येथे सर्व मुस्लिम समाज बांधव एकञ आल्यानंतर साडे नऊ वाजता येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक ईद उल फिञ ची विशेष नमाज अदा केली.

बयान (प्रवचन) मुप्ती आलीम तांबोळी, नमाज पठण व दुआ मौलाना रिजवान मनियार तर खुदब्याचे पठण मौलाना रियाज शेख पठण यांनी केले. मुस्लीम समाज बांधवांनी ईद ची नमाज अदा केल्यानंतर येथील हिंदु समाज बांधवांनी मुस्लीस समाज बांधवांची गळाभेट घेवु शुभेच्छा दिल्या तर मुस्लीम समाज बांधनांनी हिंदु समाज बांधवांना घरी बोलावुन शुर्खुम्याची मेजवानी केली दिवसभर हे चिञ आडुळ परिसरात पहावयास मिळाले.

यावेळी येथील जेष्ठ नागरीक तथा माजी सरपंच रुस्तुमराव वाघ, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शुभम पिवळ, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, राजेंद्र वाघ, विजय वाघ, नारायण पिवळ, अशोक भावले, माजी सरपंच भाऊसाहेब कोल्हे, सरपंच तुळशीराम बताडे, आप्पासाहेबअण्णा वाघ, रामुनाना पिवळ, शिवलाल राठोड, पोलीस पाटील अप्पाराव भावले यांच्या सह इतर शैकडो हिंदु समाज बांधवांनी येथील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदानावर पाचोड पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक ज्ञानेश्वर राडकर, बिट जमादार जगन्नाथ उबाडे, रणजितसिंग दुलत सह कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता. आडूळ सह रजापूर, एकतुनी, ब्राम्हणगांव, पांढरी पिंपळगाव, घारेगाव, पारुंडी आदी ठिकाणी ईद शांततेत साजरी करण्यात आली.

आज जिल्ह्यात पहिल्यांच दोन पानी ईद उल फिञ सणांच्या निमित्त 'दैनिक सकाळ' ने विशेष पुरवणी प्रकाशित केल्याने येथील मुस्लिम समाजाचा आंनद व्दिगुणित झाला तर या पुरवणीसाठी विशेष सहकार्य करणारया परिसरातील नागरीकांचे मुस्लिम समाज बांधवांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com