
यंदाही रमजान ईद साध्या पध्दतीनेच
बीड : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे पवित्र रमजान महिन्यात नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंधने होती. ईदचा सण देखील अशाच निर्बंधात साजरा करावा लागणार असून कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी मंगळवारी (ता. 11) केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत संचारबंदी व निर्बंध आहेत. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, गतवर्षी कोरोनामुळे संपूर्ण वर्षभर विविध सणोत्सव साध्या पध्दतीने साजरे करावे लागले होते. आता दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असल्याने धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे सणोत्सव देखील गर्दी न करता घरातच साजरे करावयाचे आहेत.
हेही वाचा: 'जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही',खंडपीठाचा राज्य सरकारला प्रश्न
रजमान ईदच्या अनुषंगाने 11 मे रोजी शासनाने मागर्दर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मस्जिदमध्ये एकत्रित न येता घरातच सर्व कार्यक्रम साजरे करावेत. नमाज पठणासाठी मस्जिद किंवा मोकळ्या जागेत एकत्रित येऊ नये,सणाच्या निमित्ताने प्रशासनाने दिलेल्या सवलतीच्या वेळेत गर्दी करु नये, कोविड नियमांचे पालन करावे, कलम 144 लागू असल्याने व संचारबंदी आदेश असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नयेत व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करु नये, स्थानिक पातळीवर लागू असलेल्या नियमांचे पालन करावे, रमजान ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याबाबत धर्मगुरु, स्वयंसेवी संस्था, राजकीय व सामाजिक नेते यांनी आवाहन करावे.
Web Title: Ramadan Eid Simple Way Due To Covid 19
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..