esakal | 'व्हॅलेंटाईन डे'लाच का भेटले राणा जगजीतसिंह आणि तानाजी सावंत
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, याची खात्री दोघांनाही होती. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला मोठी जबाबदारी मिळेल असा राणा पाटील यांचा कयास होता. पण राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने त्यांच्या आशेवर पाणी फिरले.

'व्हॅलेंटाईन डे'लाच का भेटले राणा जगजीतसिंह आणि तानाजी सावंत

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : परस्परांचे राजकारणातील कट्टर विरोधक अशी ओळख असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांनी व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर आपल्या विरोधकांना आणि समर्थकांनाही बुचकळ्यात टाकले. ते आज पुण्यात भेटले आणि परस्परांचे स्वागतसत्कार केल्यामुळे चांगलीच चर्चा झडली. 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या राणा पाटील आणि सावंत या दोघांनाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. या निवडणुकीपूर्वीच राणा जगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

त्या सेक्सबद्दल स्वतःहून बोलत नाहीत... पण

शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, याची खात्री दोघांनाही होती. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला मोठी जबाबदारी मिळेल असा राणा पाटील यांचा कयास होता. पण राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने त्यांच्या आशेवर पाणी फिरले.

तर दुसरीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि सत्ता असूनही आमदार तानाजी सावंत यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे सावंत यांनी मातोश्रीची पायरी न चढण्याचे ठरवले होते. आपली नाराजी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून दाखवून दिली होती. आता जिल्ह्याच्या राजकारणात राणा पाटील, सावंत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या तयारीत आहे.

मीन राशीच्या लोकांनी का राहावे सावध

उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सत्ता सध्या सावंत, राणा गटाकडे आहे. दोघांतील 'राजकीय गट्टी' पाहता भविष्यात जिल्हा सहकारी बँकेसह अनेक महत्त्वाच्या निवडणुकामध्ये हे दोन मातब्बर नेते चमत्कार घडवू शकतात. त्याअनुषंगाने पुण्यात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झालेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.  या दोन सक्षम नेत्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याच्या 'भुवया' मात्र उंचावल्या आहेत.

loading image
go to top