राणे कुणालाही भेटले नाहीत - माणिकराव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

औरंगाबाद - नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीविषयी मलाही प्रसारमाध्यमातूनच कळाले होते. त्यांच्याशी आज सकाळी बोलणे झाले. राणे हे अहमदाबादला गेले; मात्र कुणाला भेटले नाहीत. काही लोक मुद्दामहून त्यांच्याविषयी बातम्या पेरत आहेत. राणे हे नेते आहेत, ते जर कुणाला भेटले नाहीत असे सांगत असतील तर त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे, असे मत विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी (ता. 14) "सकाळ' कार्यालयात "काफी विथ सकाळ' उपक्रमाप्रसंगी त्यांनी या विषयावर मत व्यक्त केले. माणिकराव ठाकरे म्हणाले की, नारायण राणे हे अहमदाबादला गेले; मात्र ते हॉटेलमध्ये कुणाला भेटले नाहीत. काही लोक मुद्दामहून अशी माहिती पेरत आहेत. राणे हातचे राखून काही बोलत नाहीत. ते मुंबईत आल्यावर त्यांची भेट घेऊ. मला वाटते त्यांची काही नाराजी असेल.

Web Title: Rane not visit anyone