वकील महिलेवर वकिलांकडूनच अत्याचार; कृत्याचे केले चित्रीकरण

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 1 जून 2019

ओळखीचा फायदा घेऊन एका महिला वकिलावर तीन वकिलांनी अत्याचार करून चित्रिकरण केले. बदनामीची धमकी देऊन पुन्हा अत्याचार करणाऱ्या वकिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 

नांदेड : ओळखीचा फायदा घेऊन एका महिला वकिलावर तीन वकिलांनी अत्याचार करून चित्रिकरण केले. बदनामीची धमकी देऊन पुन्हा अत्याचार करणाऱ्या वकिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन अहमदपूर (जिल्हा लातूर) येथील एक महिला वकिली शिक्षण घेण्यासाठी नांदेडला ये- जा करीत होती. लग्नानंतर ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यांचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने तीने नांदेडात कायद्याचे शिक्षण घेतले. यादरम्यान तिची येथील संदीप ढगे, सोमेश कुरील आणि मंगेश लांडगे या तीन वकिलांसोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन स्नेहनगर शासकिय वसाहतीत आरोपी कुरील याच्या घरी तिच्यावर अत्याचार केला.

मार्च २०१८ ते ३० मे २०१९ पर्यंत तिच्यावर अत्याचार करून या तिघांनी अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून समाजात बदनामी करतो असे म्हणून वारंवार तिच्यावर अत्याचर केला. या प्रकाराला कंटाळून पीडीत महिला वकिलाने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरुन संदीप ढगे, सोमेश कुरील आणि मंगेश लांडगे यांच्याविरूध्द अत्याचार, विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोमेश कुरील आणि मंगेश लांडगे यांना अटक केली. त्यांना फौजदार कपील आगलावे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on Lawyer by advocates