मतिमंद मुलीवर परप्रांतियाचा बलात्कार; आरोपीला अटक

मतिमंद मुलीवर परप्रांतियाचा बलात्कार; आरोपीला अटक

लातूर- उत्तरभारतीय गुन्हेगारांकडून स्त्रियांचे लैगिक अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्याचे पहावयास मिळत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर भारतीय तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांनी अटक केली आहे.

लातूर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील वस्तीत मिक्सर विकण्यासाठी अलिगड उत्तरप्रदेश येथील महंमद कुरेशी या नावाचा 24 वर्षीय तरुण आला होता. या गावातील एका घरात मतिमंद मुलगी एकटीच असल्याचा फायदा त्याने घेतला पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून सदरील मुलीवर बलात्कार केला.

यानंतर, हा नराधम तेथून पळून गेला. घडलेली घटना यामुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितली. या घटनेची माहिती फोनवर सर्वत्र देण्यात आली. मिक्सर विकणाऱ्या या तरुणास पकडण्यात आले. त्या पीडित मुलीसमोर त्याला आणले असता तिने त्याला ओळखले. त्यानंतर, ह्या तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून ते आता पुढील तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com